सरकार स्थापनेवर शरद पवार यांचं मोठं विधान, शिवसेनेला धक्का?

भाजपा आणि शिवसेना यांना महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं बाकी याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी विरोधी पक्षातच बसणार असल्याचं स्पष्ट केलं. पवार यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसू शकतो.  

संजय राऊतांकडून कोणताही प्रस्ताव आला असं सांगतानाच अन्य निर्णय घ्यायचा झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र घेईल, असं म्हणून त्यांनी सत्तास्थापनेवर सस्पेन्सही कायम ठेवला. 

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीबाबत पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले, राऊत आणि माझी झालेली भेट ही सहज भेट होती. त्यांची भेट नेहमीच सकारात्मक होते. तशी ती आजही झाली, त्यात वेगळं काहीही नाही.  

हेही वाचा- शिवसेनेला काँग्रेसकडून धक्का? अहमद पटेल यांनी घेतली गडकरींची भेट

शिवसेना आणि भाजपा यांची २५ वर्षांची युती आहे. जनतेने त्यांच्या बाजूने कौलही दिलेला आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेने लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असंही शरद पवार म्हणाले.  


हेही वाचा-

आमचे आमदार फोडूनच दाखवा, भाजपला खुलं चॅलेंज

राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट, शिवसेनेकडून राष्ट्रवादीला प्रस्ताव सादर?


पुढील बातमी
इतर बातम्या