राज्यात ५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री?

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाच्या मागणीसाठी भाजपपासून वेगळं झालेल्या शिवसेनेला पुढची अडीच वर्षे नाही, तर ५ वर्षे मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हटले की, मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपपासून वेगळी झाल्याने त्यांचा सन्मान राखणं ही आमची जबाबदारी आहे. तर  उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चाच झालेली नाही. काँग्रेस सत्तेत सहभागी होण्यास तयार नसल्याने ही चर्चाच निरर्थक आहे. उलट सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याऐवजी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावं, अशी आमची इच्छा आहे. 

हेही वाचा- मध्यावधी निवडणुकीची शक्यताच नाही, शरद पवार यांनी दिला आमदारांना विश्वास

यावरून असा अर्थ काढला जात आहे की शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद राहील. तर काँग्रेस सरकारला बाहेरुन पाठिंबा देईल. अर्थात ही जर तरची गोष्ट असून जोपर्यंत सत्ता स्थापनेचा मसुदा अंतिम होत नाही, तोपर्यंत याबाबत ठोस काहीही सांगता येणार नाही.

सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किमान समान कार्यक्रमावर चर्चा सुरू असून ही चर्चा अंतिम झाल्यावरच तिन्ही पक्षांमध्ये पद, खाती यावर चर्चा होईल. सध्या तरी यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. आम्ही एकत्र बसून सत्ता स्थापनेचा अंतिम फाॅर्मुला निश्चित करू, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.  


हेही वाचा-

'नीळकंठ' व्हायला आम्ही तयार ! सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टिका

..तेव्हाच शिवसेनेसोबत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका


पुढील बातमी
इतर बातम्या