फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील विरोधीपक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने बुधवारी सायंकाळी ही घोषणा करण्यात आली. या निवडीनंतर आता फडणवीस सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळू शकतील.  

हेही वाचा- हायकोर्टाला चिंता शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेची

सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या मुदतीआधीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यामुळे भाजपचं सरकार अवघ्या ८० तासांत कोसळलं होतं. ज्या अजित पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपने रातोरात सरकार स्थापन केलं, ते अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन स्वगृही परतल्याने भाजपवर तोंडघशी पडण्याची वेळ आली.

राज्यपालांच्या निमंत्रणानुसार आता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असून भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्याकडे सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत.


हेही वाचा-

अजित पवारांची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी

चौथ्या दिवशीच फडणवीस सरकार कोसळलं, विश्वासदर्शक ठरवाआधीच दिला राजीनामा


पुढील बातमी
इतर बातम्या