मी राष्ट्रवादीतच होतो आणि आहे, अजित पवारांचा खुलासा

‘मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो आणि आहे. मला पक्षातून काढलेलं नाही. शरद पवार हेच आमचे नेते आहेत,’ असं म्हणत अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला होता. एवढंच नाही, तर उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. परंतु राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कुटुंबातील सदस्यांनी मध्यस्ती करत त्यांचं मन वळवल्याने त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यामुळे अवघ्या ४ दिवसांतच फडणवीस सरकार कोसळलं. त्यानंतर त्यांनी सिल्व्हर ओक इथं जाऊन शरद पवार यांची भेटही घेतली.

हेही वाचा- ‘उद्धवदादू’च्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का राज ठाकरे?

बुधवारी विधानसभेतील नवनिर्वाचीत आमदारांच्या शपथविधीसोहळ्यात सहभागी होण्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तसंच बंडाबाबत पत्रकारांनी विचारणा केल्यावर ते म्हणाले. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो आणि आहे. हे मी आधीच स्पष्ट केलं आहे. मला पक्षातून काढल्याचं तुम्ही कुठं वाचलं किंवा ऐकलं आहे का? मी राष्ट्रवादीतचं असल्याने बंड करण्याचा प्रश्नच उद्धवत नाही.

पवारांच्या भेटीसंदर्भात केलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, शरद पवार हे आमचे नेते आहेत, तेव्हा त्यांची भेट घेणं सहाजिकच आहे. पक्ष आपल्या ठिकाणी आणि कुटुंब आपल्या ठिकाणी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.  


हेही वाचा-

सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले, खडसेंचा भाजपला घरचा आहेर

भाऊ बहिणीची गळाभेट, विधानसभेत सुप्रिया सुळेंनी केलं अजित पवारांचं स्वागत


पुढील बातमी
इतर बातम्या