अमित ठाकरे कोरोना पाॅझिटिव्ह, लिलावती रुग्णालयात दाखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंं आहे. 

अमित ठाकरे यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यानंतर त्यांनी ताबडतोब कोरोनाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंं आहे.

ठाकरे कुटुंबातील ही तिसरी व्यक्ती आहे, ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. 

हेही वाचा- नवे निर्बंध लागू! आता 'या' वेळेतच खरेदी करता येईल भाजीपाला-किराणा

मुंबईतील दादर, माहीम परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. खासकरून चाळी, बैठ्या खोल्यांच्या तुलनेत इमारतींमध्ये कोरोनाचं संक्रमण वेगाने होताना दिसत आहे. महापालिकेच्या जी नाॅर्थ प्रभागात २० हून अधिक इमारती/मलजे सील करण्यात आले आहेत. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली होती. त्यावर पंतप्रधानांनी निर्णय घेतल्यावर राज ठाकरे यांच्याकडून पंतप्रधानांचे आभार मानण्यात आले.

१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की, असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं होतं.

(mns chief raj thackeray son amit thackeray tested covid19 positive)

हेही वाचा- महाराष्ट्रात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन हवाच- छगन भुजबळ

पुढील बातमी
इतर बातम्या