अयोध्या दौऱ्यासाठी मनसेची तयारी जोमात, १० ते १२ गाड्या बुक करण्याची शक्यता

हिंदुत्व आणि अयोध्या दौऱ्यावरून सध्या राज्यात राजकारण चांगलेच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला रवाना होणार आहेत. त्यासाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. मनसे कार्यकर्ते अयोध्येला जाण्यासाठी १० ते १२ गाड्या बुक करणार आहेत.

त्याचवेळी शिवसेना आता अयोध्या दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अयोध्येला भेट देणार आहेत.


मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, Z+ सुरक्षेची मागणी


दौऱ्याच्या तयारीबाबत खासदार संजय राऊत आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यात शिवसेना भवनात चर्चा झाली. या दौऱ्याच्या निमित्तानं अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचं नियोजन आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जाणार असून त्यासाठी गाड्यांचे बुकिंग करण्यात येणार आहे.

अयोध्या भेटीची माहिती देताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, अयोध्या ही शिवसेनेसाठी नवीन नाही. शिवसेना आणि अयोध्या यांचे गेल्या ३० वर्षांपासून नाते आहे. मुख्यमंत्री नसतानाही आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरे अयोध्येत आले. आता आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे वेळापत्रक आधीच ठरले असून, ४-५ दिवसांत तारीख ठरवली जाईल, असं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे.


हेही वाचा

कांदिवलीत भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची तोडफोड, शिवसैनिकांवर आरोप

पुढील बातमी
इतर बातम्या