Advertisement

निवडणुकांमुळे दिल्ली, मुंबईत भाजपकडून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण - संजय राऊत

मुंबईत, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे आवाहन दिले, ज्याची भाजपनंही मागणी केली आहे.

निवडणुकांमुळे दिल्ली, मुंबईत भाजपकडून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण - संजय राऊत
SHARES

आगामी महापालिका निवडणुकांमुळे भाजप (BJP) दिल्ली (Delhi) आणि मुंबईत (Mumbai) दंगलीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर केला आहे.

"सत्ताधारी पक्षाकडून दोन मोठ्या शहरांमध्ये ज्याप्रकारे दंगलीचे वातावरण निर्माण केले जात आहे, ते दुर्दैवी आहे. दिल्लीत महापालिका निवडणुका (Delhi BMC Election) जवळ आल्यानं असं केलं जात आहे, त्याचप्रमाणे मुंबईतही पालिकेच्या (Mumbai election) निवडणुका येत आहेत, असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मुंबईत, मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ३ मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याचे आवाहन दिले, ज्याची भाजपनंही मागणी केली आहे.

दरम्यान, दिलीप वासले-पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितलं की, राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) आणि मुंबई पोलिस आयुक्त मार्गदर्शक तत्त्वे तयार करतील ज्याचे पालन सर्व प्रार्थनास्थळांनी केले पाहिजे.

दिल्लीत, गेल्या शनिवारी मिरवणुकीदरम्यान जहांगीरपुरी परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्यानंतर दोन गटांमध्ये संघर्ष झाला. दोन पोलिसांसह काही जण जखमी झाले आहेत.

१६ एप्रिलच्या दिल्ली जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ५ जणांना अटक केली आणि एकाच कुटुंबातील एका अल्पवयीन मुलाला अटक केली.

एकूण २३ जणांना अटक करण्यात आली. यात २ अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली असून या घटनेत ८ पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकासह ९ जण जखमी झाले आहेत.



हेही वाचा

भोंग्यांबाबत पोलीस प्रमुखांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले 'हे' आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, Z+ सुरक्षेची मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा