Advertisement

कांदिवलीत भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची तोडफोड, शिवसैनिकांवर आरोप

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता भाजपचा मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात पोल खोल सभा आयोजित केली आहे.

कांदिवलीत भाजपच्या पोल खोल सभेच्या स्टेजची तोडफोड, शिवसैनिकांवर आरोप
SHARES

मुंबईतल्या (Kandivali, Mumbai) कांदिवलीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या (BJP) पोल खोल सभेच्या (Pol Khol Sabha) स्टेजची तोडफोड केल्याचा आरोप केला जातोय. कांदिवलीतील शिवसेनेचे शाखाप्रमुख सचिन पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मिळून हा स्टेजची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता भाजपचा मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात पोल खोल सभा आयोजित केली आहे. कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी या जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. या सभेला भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार प्रमुख प्रवक्ते असणार आहेत.

दरम्यान कांदिवली पूर्वमध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर ही सभा होणार आहे. या सभेसाठी मध्यरात्रीपासून स्टेज बांधण्याचं काम सुरू होतं. मात्र सभेच्या स्टेजचं काम सुरू असतानाच रात्री एकच्या सुमारास शिवसैनिक तिथे जमले आणि त्यांनी भाजपच्या या सभेच्या स्टेजटी तोडफोड केल्याचा आरोप आहे.

या घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या परिसरात सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावाचं वातावरण आहे.

नाशिकमध्ये पण अशीच एक घटना घडली आहे. भाजप पोलखोल रथयात्रेच्या रथाची तोडफोड करण्यात आली आहे. महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी रथाची तोडफोड केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. आमदार प्रसाद लाड यांनी हा आरोप केला आहे.

आरोपींना तत्काळ अटक करा नाहीतर हा रथ पोलीस ठाण्यात नेणार, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपचे मुंबई अध्यक्ष, मंगल प्रभात लोढा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल नागरिकांना सांगण्यास सांगितलं. पोल खोल मोहिमेचा एक भाग म्हणून ही व्हॅन संपूर्ण मुंबईत फिरणार आहे. पत्रा चाळजवळ गोरेगाव (पश्चिम) लेनमध्ये या व्हॅनचं लाँच करण्यात आलं.

पत्रा चाळमधील भ्रष्टाचार या व्हॅनद्वारे उघड करण्यात आला. आमदार विद्या ठाकूर यांनी मोतीलाल नगर पुनर्विकासासोबत अनेक विषयांवर भाष्य केलं.

पुढील महिनाभर दररोज सायंकाळी शहरातील चौकांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती आमदार आणि मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी दिली.



हेही वाचा

निवडणुकांमुळे दिल्ली, मुंबईत भाजपकडून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण - संजय राऊत

भोंग्यांबाबत पोलीस प्रमुखांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले 'हे' आदेश

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा