मनसेच्या नव्या कार्यकारिणीतून शिशीर शिंदेंना वगळलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नवीन कार्यकारिणीत नेतेपदी १० जणांना तर १२ जणांना सरचिटणीसपदी स्थान देण्यात आलं आहे. मात्र, राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी असलेले शिशिर शिंदे यांच नाव या कार्यकारिणीत नाही. त्यामुळे शिशिर शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार याला पुष्टी मिळाली आहे. २०२२ पर्यंत या  कार्यकारिणीची मुदत असणार अाहे.

शिशिर शिंदे नाराज

गेल्या काही दिवसांपासून शिशिर शिंदे पक्षात नाराज असल्याचं बोललं जात होतं. ते पुन्हा स्वगृही जाणार जाणार अशी चर्चा सुरु झाली अाहे. या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकारिणीत शिशिर शिंदे यांना राज ठाकरेंनी स्थान न दिल्याने त्यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चीत मानला जात अाहे. २० मे रोजी मनसेची पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली होती. मनसेने कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कार्यकारिणी तयार करण्यात आली अाहे.

१० जण नेतेपदी

बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, दीपक पायगुडे, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, जयप्रकाश बाविस्कर, प्रमोद (राजू) पाटील, अभिजित पानसे यांना नेतेपद सोपविण्यात आले आहे. तर मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, परशुराम उपरकर, हेमंत गडकरी, बाबा जाधवराव, प्रकाश भोईर, राजेंद्र शिरोडकर, राजीव चौगुले, यशवंत (संदीप) देशपांडे, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि अशोक मुर्तडक यांची सरचिटणीस पदी वर्णी लावण्यात अाली अाहे.


हेही वाचा -

मंत्रीमंडळ विस्तार लांबला

विधानपरिषद निवडणुकीत युतीत सत्तासंघर्ष


पुढील बातमी
इतर बातम्या