'या' भितीमुळं शिवसेना सर्व आमदारांना हलवणार अज्ञात स्थळी

विधानसभा निवडणुकीच्या निकानंतर शिवसेना-भाजप युतीत सत्ता स्थापनेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपचे आमदार राज्यपालांची भेट घेणार आहे. तसंच, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून आमदार फोडले जाण्याची भीती असल्यानं शिवसेना सर्व आमदारांना अज्ञात स्थळी नेलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.

अज्ञात स्थळी

शिवसेनेच्या सर्व आमदारांची बुधवारी 'मातोश्री'वर बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर सर्व आमदारांना अज्ञात स्थळी नेलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडून आमदार फोडले जाण्याची भीती असल्याने शिवसेनेने खबरदारीचा उपाय योजला आहे.

हेही वाचा - शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, ही गोड बातमी भाजपच देईल - संजय राऊत

फोडाफोडीचा प्रयत्न

शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलात ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून भाजपकडून फोडाफोडीचा प्रयत्न झाल्यास त्यांना शिवसेनेच्या आमदारांशी संपर्क साधता येणार नाही. भाजपच्यावतीनं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भाजपच्यावतीने पत्रकार परिषदेचेही आयोजन करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

कांद्यांच्या किंमतीत वाढ, मुंबईत ५० रुपये किलो कांदा

मुंबई विमानतळ ते पुणे मार्गावर धावणार शिवनेरी?

पुढील बातमी
इतर बातम्या