मंत्रालयात उभारणार प्लास्टिक बॉटल्सवर प्रक्रिया करणारी मशीन

राज्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून प्लास्टिक बंदीची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. या प्लास्टिक बंदीची सुरुवात मंत्रालयापासूनच करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळं मंत्रालयाच्या आवारात प्लास्टिक बॉटल्सवर प्रक्रिया करून नष्ट करण्याचं मशीन उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे.

रिसायकल करण्याचं बंधन

शासनानं दुधाच्या पिशव्या आणि पाण्याच्या बॉटल्सवर बंदी घातलेली नाही. पण त्या पिशव्या आणि बॉटल्सवर प्रक्रिया करून रिसायकल करण्याचं बंधन संबंधित उद्योगसमूहांना घातलं आहे. दुधाच्या पिशव्या आणि प्लास्टिक बॉटल्सला पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत रिसायकलची प्रक्रिया यंत्रणा राबविण्यावर शासन भर देणार आहे.

अारास गेटशेजारी उभारणार हे मशीन

मंत्रालयात बॉटल्सवर प्रक्रिया करणाऱ्या मशीनसाठी जागा देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार मंत्रालयाच्या आरास गेटशेजारी १० बाय ८ चौरस फुटाची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे. या जागेवर प्रस्तावित यंत्र बसवण्यात येणार आहे. प्लास्टिक बॉटल्सच्या वापरामुळं पर्यावरणाचे होणारे नुकसान ही बाब लक्षात घेऊन, हे यंत्र बसवण्यात येणार आहे.


हेही वाचा -

यापुढे प्लास्टिक वापराल तर, होईल ३ महिन्यांची शिक्षा!

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! प्लास्टिकच्या बाटल्यांना लवकरच बंदी

पुढील बातमी
इतर बातम्या