Advertisement

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! प्लास्टिकच्या बाटल्यांना लवकरच बंदी


मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! प्लास्टिकच्या बाटल्यांना लवकरच बंदी
SHARES

मुंबईकरांनो जर यापुढे तुम्हाला हॉटेल्स, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय, कँटिन, पर्यटन स्थळ इत्यादी ठिकाणी पास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आढळल्या नाही तर चकीत होऊ नका. कारण पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्यभरात प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्याच्या पर्यावरण विभागाने घेतला आहे.


बंदी कधी?

यावर्षी मार्चपर्यंत राज्यात प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, झेंडे, बॅनरपासून ते प्लास्टिकच्या प्रत्येक वस्तूंवर बंदी आणण्यासाठी पर्यावरण विभागाने एक प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवला आहे. राज्य मंत्रिमंडळाकडून एकदा का या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की मग राज्यात प्लास्टिक बंदी लागू होईल.आहार ‘असोसिएशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्तराँ' चे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं की, सरकार सध्या प्लास्टिक बंदीवर विचार करत आहे. आणि जर राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली की सरकारला प्लास्टिकच्या बाटल्यांच्या जागी पर्यायी उपाय शोधायला हवा. कारण प्लास्टिकच्या बाटल्या स्वस्त असतात. त्यामुळे यावर उपाय म्हणून सरकारने आधी प्रायोगित तत्वावर ही योजना राबवायला हवी, आणि नंतर त्यात सुधारणा करून ती लागू करायला हवी.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा