MSRTC च्या ९८ हजार कर्मचाऱ्यांना अद्याप पगार नाही

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळानं (MSRTC)नं ऑगस्ट महिन्यापासून त्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार दिले नाहीत. याविरोधात कर्मचारी नाराज आहेत. म्हणून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आहे. पण शरद पवार यांच्या भेटीनंतर आंदोलनाचा निर्णय मागे घेण्यात येऊ शकतो. 

मुंबई मिरर मधील एका अहवालानुसार, सुमारे ९८ हजार कर्मचार्‍यांना अद्याप पगार मिळालेला नाही. कोरोनाव्हायरसमुळे लागू लॉकडाऊन दरम्यान अथक परिश्रम घेतलेल्या MSRTC च्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांनी ९ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला होता.  

परिस्थिती लक्षात घेता एमएसआरटीसीच्या कर्मचारी संघटनांच्या शिष्टमंडळानं हे प्रकरण सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यापूर्वी एमएसआरटीसी कोरोना काळात दोन वेळेचं जेवण किंवा कर्मचार्‍यांच्या जागेची व्यवस्था करण्यात अपयशी ठरली होती. याचा परिणाम म्हणून अनेकांना रस्त्यावरच रात्री मुक्काम करावा लागला.

शहरातील नागरीक बेस्ट राज्य परिवहन (एसटी) बसेसचा वापर मुंबईत येण्यासाठी करतात. गेल्या काही महिन्यांत, कोरोना काळात देखील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कामावर येत होते.

एमएसआरटीसीतील अनेक कर्मचार्‍यांनाही कोरोनव्हायरसची लागण झाली होती. शिवाय, बस चालवणार्‍या आणि लोकांना मुंबईत आणणार्‍या ४०० पेक्षा जास्त एसटी चालकांना शहरातील मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.


हेही वाचा

यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द

कोरोनामुळे बेस्टच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुढील बातमी
इतर बातम्या