Advertisement

दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या

दिवाळीनिमित्त एसटी महामंडळानं दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे.

दिवाळीनिमित्त एसटीच्या दररोज १ हजार जादा फेऱ्या
SHARES

दरवर्षी दिवाळीनिमित्त (diwali) एसटी महामंडळाकडून जादा बस फेऱ्यांचं नियोजन केलं जातं. परंतू, यंदा कोरोनाचं सावट राज्यावर असल्यानं एसटी महामंडळ दिवाळीनिमित्त जादा फेऱ्या सोडणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात होत होता. मात्र, महामंडळानं या प्रश्नाचं उत्तर देत प्रवाशांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळानं (msrtc) दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे.

दिवाळी सणानिमित्त प्रवासी (passengers) गर्दीत वाढ होणं अपेक्षित आहे. त्यानुसार, वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळानं दि. ११ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे १ हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकावरून सुटणार असुन, त्या टप्प्याटप्प्यानं आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत.

याबाबत परिवहन मंत्री (transport minister) व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब (anil parab) यांनी माहिती दिली आहे. आगाऊ आरक्षणासाठी प्रवासी बंधु-भगिणीनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. एसटी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी नियमित बस फेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. दरवर्षीप्रमाणं यंदाही एसटी महामंडळानं जादा बस फेऱ्या सुरु करण्याचं नियोजन केलं आहे.

राज्य शासनानं दिलेल्या निर्देशानुसार कोविड-१९ (coronavirus) चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यकत्या सर्व सूचना व नियमांचं काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून दिले आहेत. या बाबतीत प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघनपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत स्थानिक आगाराला दिल्या आहेत.हेही वाचा -

गर्दी नियोजनाची रेल्वे व राज्य सरकारची तयारी अपुरीच

आठवड्याभरात मेट्रोची प्रवासी संख्या दुप्पट


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement