Advertisement

कोरोनामुळे बेस्टच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा मृत्यू

कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जरी चांगलं असलं तरी मृतांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे बेस्टच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांचा मृत्यू
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंबईत लॉकडाऊन (mumbai lockdown) लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व आता सामान्य प्रवाशांना वाहतूक सुविधा पुरविणाऱ्या बेस्ट प्रशासनाला कोरोनानं चांगलंच टार्गेट केलं आहे. कोरोनामुळं आतापर्यंत बेस्टमधील ५० कर्मचाऱ्यांचा (best workers) मृत्यू झाला आहे. बेस्टमध्ये कोरोनापासून बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांपर्यंत आहे. 

कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जरी चांगलं असलं तरी मृतांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त होत आहे. साधारण जूनच्या पहिल्याच आठवड्यात १४० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये आता वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण २ हजार ५०५ कोरोनाबाधित कर्मचारी बरे झाले आहेत, तर गेल्या एक आठवड्यापासून प्रतिदिन कोरोनाबाधित (corona) होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली असून ही संख्या ३०० वरून ९० वर आली आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून मुंबई महानगरात गेल्या ७ महिन्यांपासून बेस्ट उपक्रम आपली परिवहन सेवा देत आहे. परिवहनबरोबरच विद्युत विभाग, अभियंता, सुरक्षारक्षक व अन्य विभागांतील कर्मचारीही कार्यरत आहेत. परिवहन आणि विद्युत विभागातील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे, तर सुरुवातीच्या काळात काही कर्मचारी कर्तव्यावर नसतानाही करोनाबाधित झाले. कोरोनाकाळात कर्तव्यावर असताना मृत झाल्यास त्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात येत आहे, तर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावर नोकरीही देण्यात येत असून त्याची प्रक्रिया बेस्टकडून पार पाडली जात आहे.



हेही वाचा -

कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त, 'हे' आहेत नवीन दर

महिला प्रवाशांसाठी 'इतक्या' लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा