Advertisement

यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द

प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार असल्याचंही परब यांनी म्हटलं.

यंदा एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द
SHARES

दरवर्षीप्रमाणे दिवाळी (diwali) सुट्टीच्या कालावधीत हंगामी तिकीट दरवाढ (bus ticket) केली जाते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (transport minister anil parab) यांनी दिली. शिवाय, प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार असल्याचंही परब यांनी म्हटलं.

राज्य परिवहन प्राधिकरणानं दिलेल्या मान्यतेनुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून ३० टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी १० ते १५ टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून (msrtc) करत असते.

यंदा मात्र कोरोना व्हायरसच्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून सामाजिक बांधीलकीचं भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने (msrtc bus) घेतला आहे.

गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळानं अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या 'प्रवासी देवो भव' या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचंही अनिल परब यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा