कोकणातून परत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या ज्यादा बसगाड्या

गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासादरम्यान गैससोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाकडून बस सेवेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परतीच्या प्रवासासाठी १ हजार पेक्षा अधिक बस आरक्षित केल्या आहेत. राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत एसटीनं प्रवासी वाहतूक केली आहे.

कोकणच्या चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी त्यांना गावाला सुखरुप जाता यावे यासाठी एसटी महामंडळाने ज्यादा बस सोडल्या होत्या. आता मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातून येण्यासाठी एसटीच्या तब्बल १ हजार १४८ बस आरक्षित केल्या असून त्यापैकी ३४६ बसेसचे ग्रुप आरक्षण झाले आहे तर, ३६६ बसेसचे व्यक्तिगत आरक्षण फुल्ल झाले आहे. याबरोबरच उर्वरित ४३६ बसेस ह्या अंशतः आरक्षित झालेले आहेत.

गावी जाणाऱ्या अनेक सर्वसामान्य चाकरमान्यांना नेहमीच्या तिकीट दरांमध्ये सुरक्षित व सुखरूप घरी पोहोचविण्यात एसटीनं मोलाची भूमिका बजावली आहे. दरवर्षीप्रमाणं यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्यावतीनं ८ सप्टेंबर २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानकं, तसंच बसथांब्यांवर एसटीचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार असल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी 'वाहन दुरुस्ती पथक ' (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलं.


हेही वाचा -

विलगीकरण केंद्रातला आनंदोत्सव करतोय मनावरील ताण हलका!

Ganeshotsav 2020: परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या ८५५ गाड्या आरक्षित


पुढील बातमी
इतर बातम्या