Advertisement

Ganeshotsav 2020: परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या ८५५ गाड्या आरक्षित

गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासावेळी पुन्हा त्रास सहान आणि गैर सोय व्हायला नको यासाठी परतीची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

Ganeshotsav 2020: परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या ८५५ गाड्या आरक्षित
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, यंदा कोरोनामुळं कोकणात जायला मिळेल की नाही अशी चिंता गणेशभक्तांना सतावत होती. परंतु, अनेक अडचणींचा सामोरं जाऊन चाकरमान्यांनी कोकण गाठलं. मात्र, गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासावेळी पुन्हा त्रास सहान आणि गैर सोय व्हायला नको यासाठी परतीची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. रविवारपासून एसटी महामंडळातील कोकणविशेष गाड्यांचा परतीच्या प्रवासाची वाहतूक सुरू होणार आहे. परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी एकूण ८५५ एसटींचं आरक्षण करण्यात आलं आहे. यापैकी सर्वाधिक अर्थात २८५ गाड्या या आठव्या दिवशी मुंबईसाठी मार्गस्थ होणार आहेत. एसटी सोडण्याच्या निर्णय विलंबामुळं खासगी गाड्यांतून अडीच ते ३ हजार रुपये भरून कोकणात मोठ्या संख्येनं चाकरमानी दाखल झाले होते.

हेही वाचा - आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा पहिला दिवस संभ्रमाचा

या प्रवाशांनी देखील परतीच्या प्रवासासाठी स्वस्त एसटी प्रवासाला पसंती दिली आहे. रेल्वे सुरू झाली आहे, मात्र रेल्वे आरक्षणासाठी 'विशेष भाडे दर' आकारण्यात येत आहे. यामुळं थेट गावावरून सुटणाऱ्या बसला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. २३ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात उत्सव विशेष गाड्यांच्या परतीची वाहतूक सुरू होणार आहे.

या काळात एकूण ८५५ गाड्यांचं आरक्षण झालं आहे. यात गट आरक्षणाच्या १८२ गाड्यांचा समावेश आहे. परतीच्या वाहतूकीतील ६वा, ७वा आणि ८वा अनुक्रमे २८ ऑगस्ट, २९ ऑगस्ट आणि ३० ऑगस्ट महत्त्वाचे आहेत. या ३ दिवसांत तब्बल ६०० गाड्या कोकणातून मुंबईसाठी रवाना होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. ३० ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यातून १८१, रायगड जिल्ह्यातून १७० आणि सिंधुदूर्गातून ३४ बस मुंबईसाठी रवाना होणार आहेत. ही आरक्षणीय स्थिती १९ ऑगस्टपर्यंतची असल्याचं एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

Ganpati Festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन

गणेशोत्सव काळात गर्दी होता कामा नये- मुख्यमंत्री



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा