Advertisement

आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा पहिला दिवस संभ्रमाचा

कोरोनाच्या धास्तीनं मुंबई, ठाणे, पालघरमधील काही कर्मचारी अद्यापही गैरहजरच आहेत.

आंतरजिल्हा एसटी वाहतुकीचा पहिला दिवस संभ्रमाचा
SHARES

मुंबईसह राज्यभरातील प्रवाशांना एसटीनं वाहतूक सेवा दिली जाते. परंतु, यंदा कोरोनामुळं ही सेवा सामान्यांसाठी बंद असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू होती. परंतु, हळुहळू ही सेवा आता सुरू झाली असून एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी मिळाली आहे. नियोजनाच्या अभावामुळे पहिला दिवस गोंधळाचा गेला.

पुरेशा तयारीविना सेवा सुरु करण्याची घोषणा झाल्यानं वेळापत्रक तयार करताना कर्मचारी, अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. कमी गाड्या, मनुष्यबळ, बंद संगणकीय आरक्षण, विस्कळीत वेळापत्रकाचा काही प्रमाणात प्रवाशांना फटका बसला. कोरोनाची चाचणी बंधनकारक नसल्याचं स्पष्ट करुनही कोकण प्रवासासाठी २१ ऑगस्टपर्यंत चाचणी बंधनकारक असल्याचं दिसत होतं.

कोरोनाच्या धास्तीनं मुंबई, ठाणे, पालघरमधील काही कर्मचारी अद्यापही गैरहजरच आहेत. परिणामी गाड्या आणि मनुष्यबळ पुरेसे नसल्यानं काही विभागातून खूपच कमी गाड्या सुटल्याचं समजतं. आंतरजिल्हा वाहतुकीअंतर्गत एसटीनं गुरुवारी दुपारी ४ पर्यंत राज्यभरात ८४० बसेसद्वारे १ हजार ९० फेऱ्या पूर्ण केल्या होत्या.

मुंबई, ठाण्यातून दिवसभरात ५ शिवनेरी बस पुण्याकडे रवाना झाल्या. त्यातून सुमारे १०० प्रवाशांनी प्रवास के ला. दादर येथून पुण्यासाठी पहिली शिवनेरी बस सकाळी ८ वाजता २० प्रवाशांना घेऊन रवाना झाली. उपलब्ध नसलेल्या गाड्या व प्रवासीही नसल्यानं मुंबई, ठाण्यातून शिवनेरी गाड्या १ ते ३ तासांच्या अंतरानेच सोडण्यात आल्या.



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो

बेस्टच्या १,५६६ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा