रेल्वे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी; पुन्हा गाडीत रुपांतर

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढल्यानं अनेक संस्थांनी आयसोलेशन कक्ष तयार केली. रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात वाढल्यास त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हे कक्ष तयार करण्यात आले. यामध्ये रेल्वे प्रशासनाची समावेश असून, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ८९२ डब्याचे रूपांतर आयसोलेशन कक्षात करण्यात आले होते. परंतु, हे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी ठरल्याने व श्रमिक विशेष ट्रेनची कमतरता जाणवू लागल्याने या कक्षाचे रूपांतर पुन्हा प्रवासी डब्यात केले जात आहे. 

मध्य रेल्वेच्या १८३ डब्यांचं रूपांतर पुन्हा प्रवासी डब्यात केले आहे. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी रेल्वे मंत्रालयाने ५ हजार आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे ठरविले. दररोज ३७५ आयसोलेशन कक्ष तयार केले जात होते. मात्र रेल्वे प्रशासनाला श्रमिक विशेष ट्रेन कमी पडू लागल्यामुळं आता देशभरातील ५ हजार आयसीएफ डब्यांपैकी ६० टक्के डबे श्रमिक ट्रेनसाठी वापरण्यात येणार आहे.

हेही वाचा - ८९२ रेल्वे डब्यांचे वॉर्डमध्ये रूपांतर

४८२ पैकी माटुंगा वर्कशॉपमधील १२० आणि परळ वर्कशॉपमधील ६३ गाड्यांचं रूपांतर श्रमिक विशेष ट्रेनमध्ये केले आहे. कोरोना रुग्णांसाठी तयार केलेले आयसोलेशन कक्ष बिनकामी ठरल्यानं त्याची जाणीव झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. आयसोलेशन कक्षाचे रूपांतर पुन्हा प्रवासी डब्यात केले जात आहेत. त्याची पूर्वतयारी सुरू असून गाड्यांचे पडदे काढण्यात आले आहेत. डब्याचा मधला बर्थ, शिडी पुन्हा लावली आहे. आॅक्सिजन सिलेंडर काढण्यात आले आहे. आता या गाड्यांचा वापर श्रमिक विशेष ट्रेनसाठी केला जाणार आहे. 


हेही वाचा -

राज्यातील शासकीय शाळांच्या दर्जात सुधारणा

व्हॉट्सअॅप असताना टेंशन कशाला, घरबसल्या करा सिलिंडर बुकिंग


पुढील बातमी
इतर बातम्या