Advertisement

८९२ रेल्वे डब्यांचे वॉर्डमध्ये रूपांतर

मध्य आणि पश्चिम रेल्वेनं तब्बल ८९२ डब्यांचं रूपांतर वॉर्डमध्ये करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

८९२ रेल्वे डब्यांचे वॉर्डमध्ये रूपांतर
SHARES

मुंबईसह देशभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारनं रुग्णालयांमध्ये विलगीकरणासाठी कक्ष उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, अनेक रुग्णालयांमध्ये हे विलगीकरण कक्ष उभारण्यात आली आहे. अशातच करोना प्रतिबंधक उपचार म्हणून रेल्वे डब्यात विलगीकरणासाठी वॉर्ड उभारण्याचा आदेश रेल्वे मंत्रालयानं सर्व क्षेत्रीय रेल्वे प्रशासनास दिले आहेत. यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेनं तब्बल ८९२ डब्यांचं रूपांतर वॉर्डमध्ये करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

मध्य रेल्वेवर ४८२ आणि पश्चिम रेल्वेवर ४१० डब्यांचं रूपांतर वॉर्डमध्ये करण्यात येत आहे. मुंबईतील माटुंगा आणि लोअर परळ कारखान्यासह वाडीबंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये हे काम सध्या सुरू आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्याचे वॉर्डमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. विना-वातानुकूलित डब्यांचे वॉर्डमध्ये रूपांतर करण्यात येणार असून व्हेंटिलेटरची व्यवस्था असणारे, विलगीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या खाटा यांचा समावेश असल्याची माहिती मिळते.

भारतीय रेल्वेनं करोनाचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २०,००० डब्यांचं वॉर्डमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. एका डब्यात साधारणपणे १६ बेडची निर्मिती करता येते. त्यामुळं तब्बल ३ लाख रुग्णांसाठी बेडची व्यवस्था निर्माण होणार आहे.



हेही वाचा -

कोरोनामुळं डाळींच्या किमतीत २५ टक्के वाढ

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर 'टिकटॉक' केल्याप्रकरणी तक्रार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा