Advertisement

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर 'टिकटॉक' केल्याप्रकरणी तक्रार

काहींना अजूनही लॉकडाऊनच्या परिस्थितीचं गांभिर्य नसल्याचं चित्र आहे.

लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर 'टिकटॉक' केल्याप्रकरणी तक्रार
SHARES
Advertisement

मुंबईसह राज्यभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळं संपुर्ण नागरिक हैराण झाले आहेत. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळं देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नका असं आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, तरिही अनेक जण किराणा सामान व मोडिकलच्या नावानं घराबाहेर पडत आहेत. तर काही जण फेरफटका मारण्यासाठी बाहेर येत आहेत. या सर्वांची पोलिसांसकडून चौकशी केली जात असून विनाकारण घराबाहेर आलेल्यांना पोलिस चांगलाच चोप देत आहेत. असं असली तरी देखील काहींना अजून या परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलेलं नसल्याचं चित्र आहे. 

भयंकर अशा करोना व्हायरसच्या संकटामुळं संपूर्ण देश 'लॉकडाऊन' असताना त्याचं उल्लंघन करत रस्त्यावर टिकटॉक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी टिकटॉकवर व्हिडीओ करणाऱ्या आणि एक व्हिडीओ या परिस्थितीचा उपहास करणारा करून अन्य नागरिकांनाही त्यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवावा, अशी लेखी तक्रार करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी अंधेरीतील अंबोली पोलिस ठाण्यात सोमवारी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

'फैझल शेख (मुदस्सर शेख), हसनैन खान, सोहैल व फैझ बलोच अशी या टिकटॉकवर व्हिडीओ बनविणाऱ्यांची नावं आहे. या चौघांनी देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी जमावबंदीचा आदेश मोडून रस्त्यावर येऊन टिकटॉक व्हिडीओ तयार केला. दुसरा व्हिडिओ मुदस्सरने एकट्यानेच केला. त्यात तो इमारतीमधून बाहेर पडत पूर्ण शुकशुकाट असलेल्या रस्त्याला स्पर्श करत लगेच माघारी फिरतो आणि 'मौत को छु के टक से वापस हा सकता हूं', असे म्हणतो. 

या 'टिकटॉक युजर्स'चे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. त्यामुळं असे व्हिडीओ करून ते एकप्रकारे अन्य नागरिकांना सरकारचा 'लॉकडाऊन'चा आदेश मोडण्यास उद्युक्त करत आहेत. त्यामुळं त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती अली यांनी पोलिसांना केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर अत्यावश्यक कामासाठीचं पडावे अन्यथा पडू नये असं आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात आलं असताना देखील नागरिक त्याच पालन करत नाहीत. पोलिसांच्या आदेशाचं अनेकदा नागरिकांकडून उल्लंघन करण्यात येत आहे. हेही वाचा -

मुंबईत एका दिवसात ५९ रुग्ण वाढले, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार

वेतन कपात नव्हे, वेतन २ टप्प्यांत, अजित पवार यांचा खुलासासंबंधित विषय
Advertisement