Advertisement

मुंबईत एका दिवसात ५९ रुग्ण वाढले, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन असतानाही एकदम ७२ नं रुग्णसंख्या वाढली. त्यापैकी मुंबईत ५९ रुग्ण आढळले. त्यामुळे २३० वरून आकडा थेट ३०२ झाला आहे.

मुंबईत एका दिवसात ५९ रुग्ण वाढले, महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०० पार
SHARES

महाराष्ट्रात एका दिवसात ७२ कोरोनाव्हायरसचे नवे रुग्ण दाखल झाले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. देशभरात कुठल्याही एका राज्यात एकदम एवढ्या संख्येनं रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. आता राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३०२ झाला आहे.

संपूर्ण राज्य लॉकडाउन असतानाही एकदम ७२ नं रुग्णसंख्या वाढली. २३० वरून आकडा थेट ३०२ झाला आहे. एकट्या मुंबई आणि परिसरात ६७ रुग्ण वाढले आहेत. ही एका दिवसातली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. यातले खुद्द मुंबईतले ५९ रुग्ण आहेत. तर पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वाशी, विरार इथं प्रत्येकी २ रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा ७२ नं वाढला आहे.

पालिकेनं म्हटलं आहे की, “चाचणी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी काही खासगी लॅबना मान्यता देण्यात आली आहे. २४ ते २८ मार्च दरम्यान वेगवेगळ्या खासगी प्रयोगशाळांमध्ये १८ रुग्णांचे निदान झाले आहे. या सर्व रूग्णांचा पाठपुरावा पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे. आज या १८ रुग्णांचा समावेश यादीमध्ये झाल्याचं दिसून येत आहे. परंतु हे मुख्यत: आरोग्य विभागा तर्फे सार्वजनिक आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये वाढलेल्या चाचणीमुळे नवीन रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय करत आहोत.”

कस्तुरबा रुग्णालयातल्या एका कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कस्तुरबा इथं आयाबाई म्हणून काम करणारी ४४ वर्षीय महिला संक्रमित झाली आहे.

राज्यात सोमवारी कोरोनाव्हायरसमुळे २ रुग्णांचे मृत्यू झालेत. मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात ७८ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीवर उपचार सुरू होते. या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना रक्तदाब आणि हृदयरोग होता. शिवाय पुण्यातही एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ५२ वर्षांच्या रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही व्यक्ती सुरुवातीपासूनच अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.



हेही वाचा

Coronavirus : COVID-19 चा प्रसार थांबवण्यासाठी पालिका उभारणार कंटेंट झोन

Coronavirus : ठाण्यात संपूर्ण रुग्णालयच क्वारंटाईन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा