Advertisement

coronavirus : ठाण्यात संपूर्ण रुग्णालयच क्वारंटाईन

परिसरांध्ये कडक संचारबंदी किंवा लॉकडाउनची अंमलबजावणी होते. ठाण्यात याच धर्तीवर एक संपूर्ण रुग्णालय क्वारंटाइन करण्यात आलं.

coronavirus : ठाण्यात संपूर्ण रुग्णालयच क्वारंटाईन
SHARES

मुंबईतल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढते आहे. हे लक्षात घेत पोलीस आणि प्रशासन जास्त रुग्णसंख्या असलेले परिसरच क्वारंटाइन करत आहेत. अशा परिसरांध्ये कडक संचारबंदी किंवा लॉकडाउनची अंमलबजावणी होते. ठाण्यात याच धर्तीवर एक संपूर्ण रुग्णालय क्वारंटाइन करण्यात आलं.

खासगी रुग्णालयात एक रुग्ण उपचार घेत होता. त्याची कोरोनाव्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण त्याच्यामुळे पहिल्या खासगी रुग्णालयात संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेत ठाणे महापालिकेनं कारवाई केली आहे. पालिकेनं सगळं रुग्णालयच क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णालयात इतर ९ रुग्ण उपचार घेत आहेत. डॉक्टर आणि इतर कर्मचारी मिळून ३३ जण या रुग्णालयात काम करतात. या सर्वच्या सर्व ४२ जणांना इतरांपासून वेगळं ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्वारंटाइन करण्यात आलं आहे. या रुग्णालयात २३ मार्चपर्यंत एक रुग्ण उपचारासाठी दाखल होता. त्याची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं हे तातडीचे उपाय केले आहेत. तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आता अन्य रुग्णालयात उपचार घेत आहे.

मुंबई आणि परिसरात कोरोना व्हायरचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता हा संसर्ग कम्युनिटी लेव्हलला पसरू नये म्हणून प्रशासन दक्षता घेत आहे. ठाण्यात आतापर्यंत १२ कोरोनाग्रस्त सापडले आहेत.



हेही वाचा

Coronavirus Update: कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका? राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २३० वर

वेतन कपात नव्हे, वेतन २ टप्प्यांत, अजित पवार यांचा खुलासा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा