Advertisement

Coronavirus update: कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका? राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २३० वर

वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येकडे पाहून कोरोना व्हायरस आता कम्युनिटी ट्रान्समिशनच्या दिशेने वाटचाल करत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

Coronavirus update: कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका? राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २३० वर
SHARES

राज्यातील कोरोनाग्रस्तांची (coronavirus) संख्या वाढून मंगळवारी दुपारपर्यंत २३० वर जाऊन पोहोचली आहे. या वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येकडे पाहून कोरोना व्हायरस आता कम्युनिटी ट्रान्समिशनच्या दिशेने वाटचाल करत असल्याची भीती व्यक्त होत आहे. परंतु अजून तरी कोरोनाचा संसर्ग (covid-19) समाजात झालेला नसल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्य विभागाने केला आहे. 

मुंबईत कोरोनाबाधित ५ नवे तर पुण्यातील १ रुग्ण आढळून आल्यानंतर हा आकडा २३० वर पोहोचला आहे. त्याआधी दिवसाच्या सुरूवातीलाच मुंबईत १ आणि पुणे तसंच बुलडाण्यातील प्रत्येकी २ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या २२५ वर गेली होती. 

त्याचसोबत राज्यातील आतापर्यंत ३९ कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्याची सविस्तर आकडेवारी अशी : मुंबई-१४, पुणे-७, पिंपरी चिंचवड-९, यवतमाळ-३, अहमदनगर-१, नागपूर- ४, औरंगाबाद-१.सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील काेरोनाबाधितांचा आकडा देखील ९३ वर गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात ठिकठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. वरळीतील कोळीवाड्यात ४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यावर संपूर्ण कोळीवाडा परिसर पोलिसांनी सील केला. त्यापाठोपाठ कांदिवलीतील लोखंडवाला आणि गोरेगाव पूर्वेकडील बिंबीसार नगरमध्येही कोरोनाबाधित आढळल्याने हे दोन्ही परिसर सील करून तिथं जंतुनाशक फवारणी करण्यात आली. 

कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये म्हणून देशभरात संचारबंदी लागू करण्यातआली आहे. देशातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे. जीवनाश्यक वस्तूंची कमतरता भासू नये म्हणून राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. तरीही ५ ते १० टक्के जनता रस्त्यावर उतरत आहे. बाजारपेठेत जाऊन गर्दी करत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचना गांभीर्याने घेताना काही जण दिसत नसल्याने कोरोना व्हायरस समाजात पसरू शकतो, अशी भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. 
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा