आणि पहिली शिवशाही मुंबईहून निघाली बंगळुरूला

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • परिवहन

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एसटी) काळाप्रमाणे बदलत आहे. त्यातूनच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीनं अत्याधुनिक शिवशाही बस आणल्या. ही सेवा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असतानाच आता एसटीच्या शिवशाहीनं थेट राज्याबाहेरही धाव घेतली आहे.

प्रस्थान कधी?

एसटीनं मुंबई-बंगळुरू वातानुकूलित शिवशाही सेवा सुरू केली. मंगळवारी सकाळी पहिली शिवशाही मुंबईहून बंगळुरूला निघाली आहे. मुंबई सेंट्रल एसटी डेपोतून सकाळी साडे नऊ वाजता शिवशाही बस सोडण्यात आली. यावेळी एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याच हस्ते या बसचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं.

कधी पोहचणार?

सकाळी साडे नऊ वाजता निघालेली ही शिवशाही बुधवारी सकाळी सहा वाजता बंगळुरूला पोहोचेल. तर बंगळुरू-मुंबई शिवशाही मंगळवारी दुपारी 4 वाजता बंगळुरू येथून सुटणार आहे. ही बस बुधवारी दुपारी 2 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.

.

मुंबई-बंगळुरू शिवशाही ही सेमी स्लीपर असून त्यासाठी प्रवाशांना 1905 रुपये इतकं तिकीट मोजवं लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्याच्या हद्दीत तिकिटात 45 टक्के सवलत मिळत आहे.

मुंबई-बंगळुरू शिवशाही स्वारगेट, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, हावेरी आणि चित्रदुर्ग या मार्गे बॅगळुरूला पोहोचणार आहे. आता या सेवेला प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो हेच पाहावं लागेल.


हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचं गिफ्ट

पुढील बातमी
इतर बातम्या