Advertisement

शिवशाहीच्या तिकीट दरात ज्येष्ठांना सवलत

एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत एसटीनं ज्येष्ठ नागरिकांना एक खास भेट दिली आहे. ती म्हणजे शिवशाही बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्याची. परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंगळवारी याची घोषणा करत ज्येष्ठ नागरिकांना ही खूशखबर दिली आहे.

शिवशाहीच्या तिकीट दरात ज्येष्ठांना सवलत
SHARES

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा(एसटी)चा ७० वा वर्धापन दिन १ जूनला पार पडणार आहे. या वर्धापन दिनाचं औचित्य साधत एसटीनं ज्येष्ठ नागरिकांना एक खास भेट दिली आहे. ती म्हणजे शिवशाही बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्याची. परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंगळवारी याची घोषणा करत ज्येष्ठ नागरिकांना ही खूशखबर दिली आहे.


ज्येष्ठ नागरिकांची मागणी मान्य

आजच्या घडीला रातराणी आणि निमआराम बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळते. अशातच एसटीनं आता वातानुकुलित शिवशाही बस सुरू केल्या आहेत. एसटीच्या स्लिपर शिवशाही बसही आता सेवेत दाखल झाल्या आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान रातराणी आणि निमआरामी बसप्रमाणेच शिवशाही बसमधूनही सवलतीच्या दरात प्रवास करता यावा यासाठी तिकीटात सवलत द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून होत होती. ही मागणी एसटीनं मान्य केली आहे.


इतकी सवलत मिळणार

एसटीच्या ७० व्या वर्धापन दिनापासून म्हणजेच १ जूनपासून ज्येष्ठ नागरिकांना सेमी स्लिपर शिवशाही बसमध्ये तिकीटावर ४५ टक्क्यांची सवलत मिळणार आहे. तर स्लिपर शिवशाही बसमध्ये ३० टक्क्यांची तिकीटात सवलत मिळणार आहे.


हेही वाचा - 

एसटीला हवीय डिझेलवर करमाफी!

डिझेलदरवाढीचा भडका, ४ वर्षांनंतर वाढणार एसटीचे तिकीटदर!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा