डिझेलदरवाढीचा भडका, ४ वर्षांनंतर वाढणार एसटीचे तिकीटदर!

सातत्यानं होणाऱ्या डिझेल दरवाढीमुळं एसटी प्रशासनावर ४६० कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला डिझेल दरवाढीमुळं आणखी फटका बसत असल्यानं तिकीट दरवाढीशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं म्हणत एसटीनं तिकीट दरवाढ करण्यासाठी कंबर कसली आहे. एसटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना एसटीचा दरवाढीवर गांभीर्याने विचार करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

  • डिझेलदरवाढीचा भडका, ४ वर्षांनंतर वाढणार एसटीचे तिकीटदर!
SHARE

देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाल्याने त्यात सर्वसामान्यांची होरपळ होऊ लागली आहे. एकीकडं मालवाहतूकदारांनी वाहतुकीच्या शुल्कात वाढ करण्याचा विचार सुरू केला असून दुसरीकडं एसटीनेही भाडेवाढीची तयारी सुरू केली आहे. तसं झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ होण्यासोबतच प्रवासखर्च वाढून सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार आहे.


४६० कोटींचा भार

सातत्यानं होणाऱ्या डिझेल दरवाढीमुळं एसटी प्रशासनावर ४६० कोटींचा अतिरिक्त भार पडला आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला डिझेल दरवाढीमुळं आणखी फटका बसत असल्यानं तिकीट दरवाढीशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं म्हणत एसटीनं तिकीट दरवाढ करण्यासाठी कंबर कसली आहे. एसटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना एसटीचा दरवाढीवर गांभीर्याने विचार करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.


४ वर्षांनंतर दरवाढ

असं झाल्यास लालपरीचा प्रवास महागणार आहे. गर्दीच्या हंगामात प्रवाशांच्या खिशावर भार नको म्हणून तिकीट दरवाढ सातत्यानं टाळलं जात होती. महत्त्वाचं म्हणजे याआधी आॅगस्ट २०१४ मध्ये एसटीची तिकीट भाडेवाढ झाली होती. त्यानंतर आता ४ वर्षांनंतर तिकीट दर वाढण्याची शक्यता आहे.भार वाढता वाढता वाढे...

एसटी गेल्या कित्येक वर्षांपासून तोट्यात आहे. एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. असं असताना टोल दरवाढीचा एसटीवरील भारही दिवसेंदिवस वाढत आहे. एसटी १ लाख कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार असून त्यामुळंही एसटीवरील आर्थिक भार वाढणार आहे.


प्रति लिटरमागे भार

अशा परिस्थितीत डिझेलचे दर वाढतच चालल्याने एसटी प्रशासनाची चिंत वाढली आहे. मागील वर्षी एसटीला मिळणाऱ्या डिझेलचा दर सरासरी ५८.०२ रुपये प्रति लिटर असा होता. तो आता, मे २०१८ मध्ये सरासरी ६८.३९ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. म्हणजे प्रति लिटर १०.३८ रुपये जादा दर एसटीला मोजावे लागत आहेत.


लवकरच नवे दर

या वाढत्या दरवाढीमुळं २ हजार ३०० कोटी रुपये संचित तोटा सहन करणाऱ्या एसटीला यंदा केवळ डिझेल दवराढीमुळं ४६० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात एसटी प्रशासनानं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार किती आणि कशी दरवाढ करायचा यावर विचार सुरू असून लवकरच नवे दर जाहीर होण्याची शक्यता आहे.हेही वाचा-

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच

खासगी वाहतूकदारांना दणका! एसटीच्या दीडपटच भाडं आकारता येणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या