Advertisement

एसटीला हवीय डिझेलवर करमाफी!

डिझेलमुळं एसटीच्या खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी एसटीनं एकाबाजूला तिकिटांच्या दरात वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडं डिझेलवरील विविध कर माफ करावेत अशी मागणीही उचलून धरली अाहे.

एसटीला हवीय डिझेलवर करमाफी!
SHARES

इंधनाच्या वाढत्या दरवाढीचा चांगलाच फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीला बसतोय. डिझेलमुळं एसटीच्या खर्चात झालेली वाढ भरून काढण्यासाठी एसटीनं एकाबाजूला तिकिटांच्या दरात वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडं डिझेलवरील विविध कर माफ करावेत अशी मागणीही उचलून धरली अाहे. परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.


४६० कोटींचा अतिरिक्त भार

कित्येक वर्षांपासून तोट्यात असलेल्या एसटीवरील आर्थिक भार डिझेलच्या दरवाढीमुळं आणखी वाढला आहे. डिझेलमुळं ४६० कोटींचा अतिरिक्त भार एसटीवर पडला आहे. त्यातच टोल आणि एसटी गाड्यांचा मेंटेनन्सचा खर्चही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.


वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न न्यायालयाच्या दारी गेला असून वेतनवाढीसाठी एेन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संपही केला होता. त्यामुळं वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावणं हेही एसटीसमोर मोठं आव्हान आहे.


कर्मचाऱ्यांचा रोष न परवडणारा

परंतु डिझेलमुळं एसटीचा अतिरिक्त खर्च खूपच वाढत असल्यानं वेतनकरारही अडचणीत सापडला आहे. वेतनवाढ दिली नाही तर कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि हे एसटी प्रशासनाला परवडणारं नाही. त्यामुळं एसटी प्रशासानानं डिझेलवरील विविध करात माफी द्यावी, जेणेकरून डिझेल खरेदी एसटीला स्वस्त होईल, अशी मागणी सरकारकडे केली आहे.


मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

यासंबंधीचं पत्र नुकतच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, एसटीला दिलासा देतात का याकडेच एसटी प्रशासनाचं आणि कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.हेही वाचा-

खासगी वाहतूकदारांना दणका! एसटीच्या दीडपटच भाडं आकारता येणार

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाचRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा