Advertisement

आता मुंबई ते त्र्यंबकेश्वर धावणार शिवशाही बस


आता मुंबई ते त्र्यंबकेश्वर धावणार शिवशाही बस
SHARES

एसटी महामंडळाची सध्या फॉर्मात असलेली शिवशाही बस आता मुंबई ते नाशिक आणि मुंबई ते त्र्यंबकेश्वर अशी धावणार आहे. शिवशाही बसला मिळणारा प्रतिसाद बघून या बसचा विस्तार हळूहळू महाराष्ट्रत होत आहे. अल्प दरात, तसेच आरामदायक असलेल्या या सेवेमुळे लोकांनी शिवशाहीने प्रवास करण्यास पसंती दाखवली आहे.

शिवशाहीमुळे एसटीकडे पाठ फिरवणारे प्रवासी देखील आता एसटीकडे पुन्हा आकर्षित झालेले दिसत आहे. त्यासोबतच एसटीच्या लाल डब्ब्यातही बदल होऊन त्याने प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल, अशी विनावातानुकूलित लाल परी देखील लवकरच रस्त्यावर धावणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतेच एसटीच्या एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

ही बस मुंबई सेंट्रलवरून सकाळी ६ वाजता आणि ९.४५ ला निघेल तर त्र्यंबकेश्वरवरून दुपारी १४.३० आणि संध्याकाळी १९.१५ वाजता निघेल.


कसा असेल मार्ग?

ही बस दादर, सायन, कुर्ला नेहरूनगर, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड म्हाडा काॅलनी, ठाणे खोपट, कल्याण फाटा, शहापूर, नाशिक CBS मार्गे जाईल.


किती आहे तिकीट दर?

मुंबई-त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर-मुंबईसाठी अल्पदरात तिकीट आकारले जाणार आहेत. प्रौढांसाठी ३३८ रुपये. तर लहान मुलांसाठी १७० रुपये आकारले जाणार आहेत.



हेही वाचा

एसटी महामंडळ अधिकाऱ्यांसाठी खुशखबर!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा