Advertisement

एसटी महामंडळ अधिकाऱ्यांसाठी खुशखबर!


एसटी महामंडळ अधिकाऱ्यांसाठी खुशखबर!
SHARES

सध्या एसटी महामंडळात कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या १३१ अधिकाऱ्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी ३ वर्षांवरुन १ वर्ष कारण्यासंबंधीच्या निर्णयाला नुकतीच दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानुसार लवकरच त्यांना देखील १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने नियमित वेतन देण्यात येणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक एसटी प्रशासनाने बुधवारी प्रसारित केले आहे.


कनिष्ठ वेतन श्रेणी कालावधी १ वर्ष

एसटी महामंडळात नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना आतापर्यंत पहिली ३ वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. परंतु, परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी सन २०१७च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीतील सर्वच कर्मचाऱ्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी ३ वर्षांवरुन १ वर्षे करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.


पूर्वलक्ष्यी प्रभावाने मिळणार वेतन

पहिल्या ६ महिन्यांनंतर संबंधित कर्मचाऱ्याला रु. ५०० वेतनवाढ देण्यात येणार आहे. तसेच वर्षभर समाधानकारक काम केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुढील वर्षापासून नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार एसटीत कार्यरत असलेल्या सुमारे १ लाख कर्मचाऱ्यांपैकी विविध २५ संवर्गातील मिळून १२ हजार ५१४ कनिष्ठ कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाला आहे.



हेही वाचा

एसटीला अांदोलनाचा फटका, २० कोटींचं नुकसान


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा