Advertisement

एसटीला अांदोलनाचा फटका, २० कोटींचं नुकसान


एसटीला अांदोलनाचा फटका, २० कोटींचं नुकसान
SHARES

भीमा-कोरेगावच्या हिंसाचारानंतर महाराष्ट्र बंदलाही हिंसक वळण लागल्यामुळे एसटी बसेसची तोडफोड करण्यात अाली. त्यामुळे अांदोलनाचा फटका एसटीला बसला असून यात एसटी महामंडळाला तब्बल २० कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं अाहे. दोन दिवस पेटलेल्या या अांदोलनात एसटीच्या २१७ बसेसची तोडफोड झाली असून त्यामुळे एसटीचं १ कोटींचं नुकसान झालं अाहे. त्याचबरोबर या बंदच्या काळात २५० अागारांपैकी २१३ अागारांमधील बहुतांश बसची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे एसटीचा १९ कोटी रुपयांचा महसूल बुडाला अाहे.


नुकसान एसटीच सोसणार

एसटी महामंडळाचं मोठ्या प्रमाणात अार्थिक नुकसान झालं असलं तरी अांदोलनकर्त्यांच्या भावनांचा अाम्ही अादर राखत अाहोत. एसटीचं झालेलं नुकसान हे अांदोलनकर्त्यांकडून वसूल न करता एसटी स्वतः हे नुकसान सोसणार अाहे, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं. हिंसाचाराच्या काळात एसटीची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले, त्याबद्दल एसटी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने रावते यांनी दिलगिरी व्यक्त केली.


नुकसान न भरून निघणारे

तोडफोड झालेल्या बस दुरुस्त होऊन भविष्यात रस्त्यावरही धावतील, पण एसटी महामंडळाचं झालेलं हे नुकसान न भरून निघणारं अाहे. एसटीला दैनंदिन महसूलापासून वंचित राहावं लागलं अाहे, अशी माहितीही एसटी प्रशासनानं दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा