Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांनाही अाता मिळणार मुंबईत घर


एसटी कर्मचाऱ्यांनाही अाता मिळणार मुंबईत घर
SHARES

गेली अनेक वर्ष एसटी तोट्यात गेल्यामुळे कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष होत होते. अाता एसटीमध्ये अामूलाग्र बदल करण्याचा निर्णय परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला अाहे. अाता एसटी कर्मचाऱ्यांसाठी अानंदाचा बातमी म्हणजे मुंबईत हक्काचे घर मिळण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार अाहे. विद्याविहार या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांना घर मिळणार असून कर्मचाऱ्यांसाठी १ बीएचके तर अधिकारी वर्गासाठी २ बीएचके असे हे घर असणार अाहे. तसंच सर्व सोयीसुविधा या वसाहतीत असतील. एसटी कर्मचाऱ्यांसाठीच्या नवीन गणवेशाचे उद्घाटन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात अाले. त्यावेळी ही गोड बातमी कर्मचाऱ्यांना देण्यात अाली.



कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप

एसटी कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या गणवेशात रंगामध्ये भिन्नता असल्यामुळे चालक, वाहक तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन गणवेश तयार करण्यात अाला अाहे. एक लाख कर्मचाऱ्यांना या गणवेशाचे वाटप करण्यात अाले.



एसटीचा होणार कायापालट

एसटी बसेसचा कायपालट करणार असल्याचे दिवाकर रावते यांनी यावेळी स्पष्ट केले. स्मार्ट कार्ड, बस स्थानके आणि बसेसची स्वच्छता, पर्यावरणपूरक प्रसाधनगृहांची निर्मिती, लाल डब्याचे लाल परीमध्ये रुपांतर, ३ हजार ५०० मार्गस्थ निवाऱ्यांची उभारणी, ८० बस स्थानकांचे नुतनीकरण, दर्जावाढ, चालक-वाहक विश्रांतीगृहाचा कायपालट आणि १ हजार कर्मचाऱ्यांना निवास्थान याप्रकारे अाता एसटीमध्ये बदल होणार असल्याचे रावतेंनी सांगितले.


एसटीचाचा लाल डबा होणार बंद

यासोबतच एसटीच्या बसमध्येही मोठे बदल होणार आहेत. हा लाल डबा आता लालपरीच्या रूपात अत्यंत अत्याधुनिक सुविधांसह प्रवाशांसमोर येणार आहे. आरामदायी आसन, मोठ्या खिडक्या, विना वातानुकलित अशी ही बस असणार आहे. विशेष म्हणजे अारामदायी असलेल्या नव्या लालपरीचा तिकीट दरही तितकाच असणार अाहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा