Video: एका बॅगने केली हार्बरसेवा ठप्प

सकाळी ऐन गर्दीच्या सुमारास हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याने पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अज्ञात इसमाने ट्रेनच्या पेंटाग्राफवर बॅग फेकल्यामुळं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे.

नेमकं काय झालं?

वाशी रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफला अचानक आग लागली. आगीमुळे सर्वत्र धूर पसरून रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणत गाडी कारशेडमध्ये पाठवली. या आगीमुळे कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. हार्बर मार्गावरील रेल्वेचं वेळापत्रक कोलमडून दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या. 

ही बॅग नेमकी कोणी फेकली, याचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीचे फुटेज तपासत आहेत. 


हेही वाचा-

बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर

सीएसएमटी-पनवेल लोकलला आग, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत


पुढील बातमी
इतर बातम्या