Advertisement

सीएसएमटी-पनवेल लोकलला आग, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत


सीएसएमटी-पनवेल लोकलला आग, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी-पनवेन लोकलला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याचं समजतं. आगीच कारणं अद्याप अस्पष्ट असून, जीवितहानीती माहिती मिळालेली नाही. सध्य ही लोकल दुरूस्तीसाठी कारशेडमध्ये पाठविण्यात आलं आहे.

प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण

सीएसएमटीहून सुटलेली ही लोकल वाशी स्थानकात ९.२३ वाजता पोहोचताच या लोकलला आग लागली. आग लागल्याचं समजताच प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं, प्रवाशी तातडीनं लोकलमधून खाली उतरले. वाशी स्थानकात घटना घडल्यामुळं स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.


लोकलला आग

वाशी स्थानकात सीएसएमटी-पनवेल लोकलला आग लागल्यामुळं अनेक लोकल रद्द करण्यात आल्याचं समजतं. त्यामुळं प्रवाशांना कामावर जाण्यास उशीर होणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनानं याघटनेची दखल घेतली असून, लोकल दुरूस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवण्यात आली आहे.हेही वाचा -

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बुधवारी राहणार बंद

मुंबईतील मतदारांच्या संख्येत वाढ, सर्वाधिक मतदार 'या' मतदारसंघातRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा