Advertisement

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बुधवारी राहणार बंद


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बुधवारी राहणार बंद
SHARES

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद राहणार आहे. काहीतांत्रिक कामांमुळं मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक बुधवारी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत या कालावधीत बंद राहणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली असून, पुणे लेनवर ६५.७०० किमी या ठिकाणी ओव्हर हेड गँट्री बसवण्याचं काम करण्यात येणार आहे.

वाहतूक बंद

दुरूस्ती कामाच्या कालवधीत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याकडं जाणारी वाहतूक पूर्णपणं बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व प्रकारची अवजड आणि मालवाहतूक करणारी वाहनं द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोल नाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२.५०० किमी अंतरावर थांबवण्यात येणार आहेत. तसंच, हलकी चारचाकी वाहनं आणि अन्य प्रवासी वाहनं ही कुसगाव टोलनाक्यावरून जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील.

दुरूस्तीचं काम

द्रृतगती मार्गावरील दुरूस्तीच्या कामामुळं बुधवारी मुंबईहून पुण्याकडं जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळं बुधवारी दुपारी १२ ते २ या काळात मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा