Advertisement

महायुतीला ३० जागांवर बसणार बंडखोरांचा फटका?


महायुतीला ३० जागांवर बसणार बंडखोरांचा फटका?
SHARES

विधानसभा निवडणुक आता तोंडावर असताना सर्व पक्षीय उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. अशातच राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना-भाजप महायुती मोठी तयारी करते. या दोन्ही पक्षांनी मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी यात्रा काढल्या होत्या. यावेळी त्यांना थेट मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर तयारी जोरदार सुरू आहे. मात्र, या महायुतीची बंडखोरांमुळं डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील एकूण ३० विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्यानं या ३० जागांवर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपक्ष उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी राज्याभरातील ५० मतदारसंघात १४४ सर्वपक्षीय बंडखोरांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. या बंडखोरीचा सर्वाधिक फटका शिवसेना-भाजप महायुतीला बसला आहे. राज्यात शिवसेना-भाजपची युती झाल्यानं दोन्ही पक्षातील अनेकांना उमेदवारी मिळालेलं नाही. त्यामुळं दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांनी बंडाचं निशाण फडकावत उमेदवारी अर्ज भरले होते.

३० जागा

दरम्यान, काही बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी थोपविण्यात शिवसेना-भाजपला यश आलं. मात्र, एकूण ३० जागांवरील बंडखोरांचं मन वळविण्यात दोन्ही पक्षाला यश आलेलं नाही. त्यामुळं राज्यातील ३० जागांवर युतीला बंडखोरांचा फटका बसण्याचं चिन्ह आहे. यामध्ये मुंबईतील ३ जागांचाही समावेश आहे.

उमेदवारी अर्ज

मुंबईत शिवसेनेच्या नगरसेविका राजूल पटेल यांनी वर्सोवा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली आहे. अंधेरी पूर्व इथं भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.



हेही वाचा -

शिवसेना दसरा मेळावा : १० रुपयात भरपेठ जेवण आणि १ रुपयात आरोग्य चाचणी, उद्धव ठाकरेंची घोषणा

आरेच्या आखाड्यात रोहीतची बॅटींग, मेट्रो प्रशासनाला सुनावलं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा