Advertisement

मुंबईतील मतदारांची संख्या वाढली, सर्वाधिक मतदार 'या' मतदारसंघात


मुंबईतील मतदारांची संख्या वाढली, सर्वाधिक मतदार 'या' मतदारसंघात
SHARES

यंदा मतदारांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक याकाळात मुंबईत २६ हजार १९८ मतदार वाढले आहेतऑनलाइन मतदारनोंदणीत वाढ  झाली असून, कुलाब्यात सर्वाधिक वाढ आहे. तसंच, ऑफलाइनमध्ये सध्या चर्चेत असलेल्या वरळी मतदारसंघातील संख्या सर्वाधिक आहे.

मतदारांच्या संख्येत वाढ

मुंबई जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत २६ हजार १९८ मतदार वाढले आहेत. यामधील ९० मतदार हे अनिवासी भारतीय असल्याचं समजतं. एकूण १२ हजार ९०५ मतदारांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यापैकी  १२ हजार ४९९ मतदारांची नावं यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ऑनलाइनमध्ये १८ हजार ९७० अर्ज आले होते. ४ हजार ८८९ अर्ज विविध कारणात्सव रद्द करण्यात आले. त्यानंतर १३ हजार ६०९ मतदारांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत.

'हा' मतदारसंघ

मुंबईतील कुलाबा मतदारसंघात मतदारांची सर्वाधिक संख्या वाढली आहे. इथं ऑनलाइन व ऑफलाइन मिळून ३ हजार ८२९ मतदार वाढले आहेत. ऑनलाइनमध्ये २७४९ इतकी सर्वाधिक संख्या याच मतदारसंघात वाढली आहे. त्याशिवाय ऑफलाइनमध्ये वरळी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २५६२ इतके मतदार वाढले आहेत


हेही वाचा -

महायुतीला ३० जागांवर बसणार बंडखोरांचा फटका?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बुधवारी राहणार बंद



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा