Advertisement

बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्ट कामगारांच्या कृती समितीनं संपाची हाक दिली होती. मात्र, कामगारांच्या या संपाविरोधात प्रशासनानं औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे.

बेस्ट कामगारांचा संप लांबणीवर
SHARES

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेस्ट कामगारांच्या कृती समितीनं संपाची हाक दिली होती. मात्र, कामगारांच्या या संपाविरोधात प्रशासनानं औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळं या सुनावणीनंतरच कृती समिती संपाबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळं तूर्तास मुंबईकरांना कामगरांच्या संपापासून दिलासा मिळाला आहे.

कामगारांचा संप

सुधारित वेतनश्रेणीच्या सामंजस्य करारावर शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेना व अन्य संघटनांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र बेस्ट वर्कर्स युनियन व अन्य संघटनांनी या करारावर सही केली नाही. त्यामुळं या कामगारांना सानुग्रह अनुदान व वाढ नाकारण्यात आली. या कराराला विरोध करीत कृती समितीनं ९ आॅक्टोबरपासून संप पुकारण्याचा इशारा दिला होता.

याचिकेवर सुनावणी

या संपाविरोधात बेस्ट प्रशासनानं औद्योगिक न्यायालयाकडं दाद मागितली असून, या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. तसंच, कामगार आयुक्तांकडंही १४ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळं याप्रकरणी आता कामगार आयुक्त काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

सीएसएमटी-पनवेल लोकलला आग, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईकरांना ऑक्टोबर हिटची जाणीव, कमाल तापमानत वाढRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा