Advertisement

मुंबईत ऑक्टोबर हिटच्या झळा, कमाल तापमानात झाली 'इतकी' वाढ

मुंबईसह उपनगरात पावसानं विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांना प्रचंड उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

मुंबईत ऑक्टोबर हिटच्या झळा, कमाल तापमानात झाली 'इतकी' वाढ
SHARES

मुंबईसह उपनगरात पावसानं विश्रांती घेतल्यानं मुंबईकरांना प्रचंड उकाड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. सध्या मुंबईकरांना ऑक्टोबर हिटची जाणीव होत असून, अनेकांनी उन्हाचा सामना करण्यापेक्षा घरात थांबणं पसंत केलं आहे. मंगळवारी सांताक्रूझ इथं कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांवर होता. परंतु मागील २ दिवसांपेक्षाही मंगळवारी तापमानात वाढ झाली होती. 

परतीचा पाऊस

परतीच्या पावसाला अद्याप सुरूवात झालेली नाही. तसंच, वायव्य भारतामधून पुढील २ दिवसांमध्ये मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार असल्यामुळं अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. मुंबईमध्ये अचानक तापमानात वाढ झाली असली तरी मुंबईतून अजून मान्सून माघारी गेलेला नाही. मात्र आर्द्रतेमध्ये हळूहळू घट दिसत आहे.

कमाल तापमान

सांताक्रूझ इथं कमाल तापमान सरासरीपेक्षा १.३ अंशांनी आधिक म्हणजे ३४ अंश होतं. तसंच, कुलाबा इथं कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअस होतंकमाल तापमानासोबतच कुलाबा इथं मंगळवारी किमान तापमानाचा पाराही वाढला होता. कुलाबा इथं किमान तापमान २६.५ अंश सेल्सिअस होतं. मंगळवारी सकाळी किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सिअसनं अधिक नोंदला गेला. सांताक्रूझ इथं किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.हेही वाचा -

सीएसएमटी-पनवेल लोकलला आग, हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील मतदारांच्या संख्येत वाढ, सर्वाधिक मतदार 'या' मतदारसंघातसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा