'परे'च्या प्रवाशांना दिलासा...32 फेऱ्यांत वाढ

पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या बघून पश्चिम रेल्वेवरच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर ३२ नव्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या नव्या वेळापत्रकाचे उद्घाटन रेल्वमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात येईल. नव्या वेळापत्रकानुसार १५ डबा गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या आता ५४ वर पोहोचली आहे. अनेक फेऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहे.

१५ डब्यांची सख्या वाढणार

येत्या एक ऑक्टोबरपासून अप दिशेला १७ तर डाऊन दिशेला १५ फेऱ्या वाढवण्यात येतील. यातील ४ अतिरिक्त फेऱ्या सकाळच्या पिक अावरमध्ये अर्थात गर्दीच्या वेळी तर ३ फेऱ्या संध्याकाळच्या पिक अावरमध्ये चालवण्यात येतील.

या गाड्या रविवारी देखील धावणार आहेत. याशिवाय ४ फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये अप दिशेला एक तर डाऊन दिशेला ३ फेऱ्यांचा समावेश आहे.

चर्चगेट ते विरार वेळापत्रकात बदल

चर्चगेटसाठी १६ अतिरिक्त फेऱ्या आणि बोरीवली-विरार करता ५ अतिरिक्त फेऱ्या जलद-धिम्या मार्गावरून धावणार आहेत. मालाडहून सुटणाऱ्या २ आणि गोरेगावहून सुटणाऱ्या ४ गाड्या सकाळी पिक अावरमध्ये अंधेरीपर्यंत जलद मार्गावरून धावणार आहेत. 

याशिवाय मालाड-चर्चगेट ही संध्याकाळी ५.३४ ची जलद लोकल आता बोरीवलीहून संध्या. ५.२७ वाजता सुटणार आहे. दुपारी १२.१३ ची चर्चगेट-भाईंदर जलद लोकल आता विरारपर्यंत तर संध्या. ७.५४ ची चर्चगेट-अंधेरी धीमी लोकल आता बोरिवलीपर्यंत चालवण्यात येईल. रात्री ८.२६ची अंधेरी-विरार धीमी लोकल आता रात्री ८.१२ वाजता वांद्रे स्थानकातून सुटणार आहे. वाढलेल्या फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्ववर दिवसभरात एकूण होणाऱ्या १३२३ फेऱ्यांची संख्या आता १३५५ वर पोहोचली आहे.

परे अप मार्गावर नवीन १२ डबा लोकलचे वेळापत्रक

रेल्वे

सुटणार

पोहोचणार

विरार-अंधेरी    
स. ६.००  
स. ६.४८
नालासोपारा-दादर    
स. ७.२६      
स. ८.२२
विरार-अंधेरी        
स. ७.४८        
स. ८.३५
विरार-बोरीवली          
स. ९.४०      
स. १०.१५
विरार-अंधेरी          
स. ९.४७      
स. १०.३६
वसईरोड- अंधेरी        
स. १०.५८  
स.११.४९
विरार-अंधेरी  
स. ११.३२  
दु.१२.२६
बोरीवली-चर्चगेट    
स. ११.५३      
दु.१.०१
विरार-अंधेरी      
दु. १.०८    
दु.२.०५
विरार-अंधेरी        
दु. १.४६    
दु.२.४०
विरार-अंधेरी          

दु. २.५३  

दु. ३.५०

विरार-अंधेरी          

दु. ३.१६      

दु. ४.१७

विरार-अंधेरी      

दु. ३.५४      

दु. ४.४६

मालाड-चर्चगेट  

दु. ४.४५        

दु. ५.२७

विरार-अंधेरी

संध्या. ५.१७        

संध्या. ६.१६

वसई रोड-अंधेरी    

संध्या. ५.५७        

संध्या. ६.३९

विरार-दादर        

संध्या. ७.३७      

 रात्री. ८.४२

           

'परे' डाऊन मार्गावरून सुटणाऱ्या लोकल

                                                

ट्रेन        

सुटणार

पोहोचणार

अंधेरी-विरार    

 स. ६.५७    

स. ७.४५

दादर-विरार      

स. ८.२९    

स. ९.३५

अंधेरी-विरार          

स. ८.५२    

स. ९.४१

बोरीवली-वसई रोड    

स. १०.१९      

स. १०.४४

अंधेरी-विरार        

स. १०.४२    

स. ११.३४

अंधेरी-विरार    

दु. १२.०१  

दु. १.०२

अंधेरी-भाईंदर

दु. १२.३५

दु. १.१२

चर्चगेट-विरार        

दु. १.०८      

दु. २.५२

अंधेरी-विरार      

दु. २.१३    

दु. ३.१२

अंधेरी-विरार          

दु. २.५०                

दु. ३.४३

अंधेरी-विरार        

दु. ४.१०  

दु. ५.०९

अंधेरी-वसई रोड      

दु. ४.५९    

दु. ५.४२

अंधेरी-विरार    

संध्या. ६.४५

संध्या.७.३३

अंधेरी-नालासोपारा    

संध्या. ६.५२    

संध्या. ७.४५

दादर-विरार        

रात्री ८.४७      

रात्री ९.४८

'परे'च्या नवीन १५ डबा लोकल गाड्या

ट्रेन

सुटणार

पोहोचणार

विरार-चर्चगेट    

प. ५.०७  

 स. ६.२५

चर्चगेट-विरार

स. ६.३३      

स. ७.५५

विरार-चर्चगेट    

स. ८.०९  

स.९.३६

चर्चगेट-बोरीवली

स.९.४०

स.१०.२८

बोरीवली-चर्चगेट

स.१०.३४

स.११.२४

चर्चगेट-विरार

स.११.२७

द१२.४८

विरार-दादर

दु.१.१४

दु.२.२२

दादर-विरार

दु.२.४४

दु.३.५१

विरार-दादर

दु.४.०३

दु.५.०९

दादर-विरार

संध्या.५.२५

संध्या,.६.३३

विरार-चर्चगेट

संध्या ६.४५

रात्री ८.१०

चर्चगेट विरार

रात्री ८.१४

रात्री.९.४०


हेही वाचा - 

पश्चिम रेल्वेवर वाढणार फर्स्ट क्लासचे डबे

पुढील बातमी
इतर बातम्या