पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर !

 Andheri
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर !

अंधेरी- पश्चिम रेल्वेची डहाणू ते बोरीवली लोकल आता अंधेरीपर्यंत धावणार आहे. प्रवाशांची होणारी गर्दी पाहून पश्चिम रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून ही लोकलसेवा सुरू होणार आहे. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी 5.40ला डहाणू रोड स्थानकावरून पहिली लोकल सुटणार आहे. तर ती सकाळी 7.34 वाजता अंधेरी स्थानकावर पोहचणार आहे. तसेच अंधेरी ते डहाणू रोड लोकल अंधेरीहून सकाळी 7.38 वाजता सुटणार असून सकाळी 9.50 वाजता डहाणूला पोहचणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा किमान अर्धा ते पाऊण तास वाचणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Loading Comments