रांग लावून पकडा लोकल, 'माय लेफ्ट इज माय राइट' उपक्रम सुरू

लोकल, एक्स्प्रेसमध्येमध्ये चढताना अनेकवेळा धक्काबुक्की होऊ वाद होतात. या वादाचं रुपांतर मारामारीतही होते. त्यामुळे शिस्तबद्ध रांगा लावून लोकल आणि एक्स्प्रेसमध्ये चढण्याचं आवाहन रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) केलं आहे. यासाठी आरपीएफने ‘माय लेफ्ट इज माय राइट’ हा उपक्रम सुरू केला आहे.  

 ‘माय लेफ्ट इज माय राइट’ उपक्रमातून प्रवाशांना रांगेत जाण्याचं आवाहन केलं जात आहे. या उपक्रमामुळे धक्काबुक्की, भांडणे याला पूर्णविराम मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे. या संकल्पनेतून प्रवाशांना डाव्या बाजूने जिन्यावरून चढण्याचं-उतरण्याचं आवाहनही केलं जात आहे.  ‘माय लेफ्ट इज माय राइट’ या संकल्पनेची माहिती ‘आॅपरेशन क्यू’ मध्ये दिली जात आहे. एक्स्प्रेसमधील ‘आॅपरेशन क्यू’द्वारे प्रवाशांना एका रांगेत मेल, एक्स्प्रेसमध्ये चढण्या-उतरण्याचे आवाहन केले जाणार आहे.

पश्चिम रेल्वेचे भार्इंदर, बोरीवली मध्य रेल्वेचे दादर, कल्याण, बदलापूर, शहाड येथे प्रवासी रांगा लावून लोकलमध्ये चढत आहेत. तर प्रथम श्रेणीच्या डब्याजवळ प्रवासी रांगा लावून उभे राहतात. यासह महिला डब्याजवळ महिला प्रवाशांकडून रांग लावली जात आहे.  मेल, एक्स्प्रेसमध्ये चढताना-उतरताना रांगेत उतरल्यास धक्काबुक्की होणार नाही. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने घेण्यात येत आहे. विशेष एक्स्प्रेस, स्थानकावरील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे.


हेही वाचा -


पुढील बातमी
इतर बातम्या