Advertisement

सवलतीसाठी रेल्वे प्रवाशी वाढवतात वय

रेल्वे प्रवासात ५८ वर्षांपुढील वय असलेल्या महिला व ६० वर्षांपुढील पुरुष प्रवाशांना ५० टक्के सवलत मिळते. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सोबत ओळखपत्र बाळगावे लागते.

सवलतीसाठी रेल्वे प्रवाशी वाढवतात वय
SHARES

रेल्वेच्या तिकीट दरात सवलत मिळावी आणि तिकीट कन्फर्म व्हावे म्हणून अनेक प्रवाशी आपलं वय वाढवून सांगत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ऑक्टोबरमध्ये मध्य रेल्वेने असं वय वाढवून सवलत घेणाऱ्या १११ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १ लाख रुपयांपेक्षा अधिक दंडही वसूल केला आहे. 

 रेल्वे प्रवासात ५८ वर्षांपुढील वय असलेल्या महिला व ६० वर्षांपुढील पुरुष प्रवाशांना ५० टक्के सवलत मिळते. यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सोबत ओळखपत्र बाळगावे लागते. तिकिट तपासनीसाला हे ओळखपत्र दाखवावं लागतं.  मात्र प्रवासात या प्रवाशांचे ओळखपत्र तपासल्यानंतर अनेक प्रवासी ज्येष्ठ नागरिक नसल्याचं उघडकीस आलं आहे.  सवलती व सुविधांसाठी प्रवाशांनी वय वाढवल्याचं समोर आलं आहे.  

तिकीट तपासनीसांना अशा प्रवाशांच्या तिकीट व ओळखपत्रावर वयात तफावत आढळली आहे. ओळखपत्रावरील जन्मतारीख पाहता तिकिटावरील महिलांचे वय ५८ पेक्षा आणि पुरुष प्रवाशांचे वय ६० पेक्षा कमी असल्याचं मध्य रेल्वेवर पकडण्यात आलेल्या प्रकरणांत समोर आलं आहे.  रेल्वे प्रवासात प्रवाशांकडे बनावट ओळखपत्रही आढळली आहेत. ४० बनावट ओळखपत्रे प्रवाशांकडून हस्तगत केली आहेत.

 एक्स्प्रेस गाडय़ांच्या तिकिटांतही गैरप्रकार होत आहेत. एका प्रवाशाच्या नावावर दुसरा प्रवाशी प्रवास करत असल्याचंही आढळून आलं आहे. अशी २५९ प्रकरणे उघडकीस आली असून २ लाख १४ हजार ८१० रुपये दंड वसूल केला आहे.हेही वाचा -

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेवर प्रवासी नाराज

पहिली 'लेडीज स्पेशल' ट्रेन धावली मुंबईत
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा