Advertisement

पहिली 'लेडीज स्पेशल' ट्रेन धावली मुंबईत

लेडीज स्पेशल लोकल जगातील पहिली ट्रेन ठरली असून ती प्रथम मुंबईत धावली.

पहिली 'लेडीज स्पेशल' ट्रेन धावली मुंबईत
SHARES

सध्याच्या जगात नेकरीसाठी घराबाहेर पडत असलेल्या महिलांची संख्या वाढली आहे. या महिला प्रवाशांची रेल्वे प्रवासावेळी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं महिलांसाठी 'लेडीज स्पेशल' लोकल सुरू केली. विशेष म्हणजे ही लेडीज स्पेशल लोकल जगातील पहिली ट्रेन ठरली असून ती प्रथम मुंबईत धावली. लोकलनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवशांची गर्दी दिवसेंदिवस वाढ जात असून, लेडीज स्पेशल लोकलही भरून जात आहे.

लेडीज स्पेशल

पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-बोरिवली स्थानकादरम्यान ५ मे १९९२ रोजी पहिली लोकल धावली. त्यानंतर ११ मे १९९२ रोजी बोरिवली-चर्चगेट 'लेडीज स्पेशल' सुरू झाली. मग ही लोकल चर्चगेट-विरार अशी करण्यात आली होती. १७ ऑगस्ट १९९८ला चर्चगेट-बोरिवली सेवा सुरू झाली. सन २००३ मध्ये बोरिवली-चर्चगेट लेडीज स्पेशल सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र कालांतरानं २००५ मध्ये ही लोकल खंडित करण्यात आली.

हेही वाचा - ट्रान्स हार्बरवर प्रवाशांना लोकलच्या प्रथम दर्जा डब्यातून प्रवास करण्याची मुभा

लोकल १२ डब्यांच्या

२५ एप्रिल २००६ रोजी भाईंदर-चर्चगेट सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर बोरिवली-चर्चगेट पुन्हा सुरू झाली. सन २००९ मध्ये चर्चगेट-भाईंदर सेवा सुरू करण्यात आली. या सगळ्या लोकल १२ डब्यांच्या आहेत. लेडीज स्पेशल म्हणून जाणारी लोकल परतीच्या प्रवासात मात्र सर्वसाधारण लोकल होते. मध्य रेल्वेवर एकूण ४ 'लेडीज स्पेशल' सेवा आहेत. मात्र इतर काही लोकलच्या महिला प्रवाशांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा - पश्चिम रेल्वेवर धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल

२० सेवा लेडीज स्पेशल

मध्य रेल्वेच्या एकूण २० सेवा लेडीज स्पेशल आहेत. पश्चिम रेल्वेवर 'लेडीज स्पेशल' सुरू केल्यानंतर मध्य रेल्वेवर १ जुलै १९९२ रोजी पहिली 'लेडीज स्पेशल' धावली होती. हार्बरचा 'लेडीज स्पेशल' प्रवास १ जुलै २००३ ला सुरू झाला. ही लोकल सीएसएमटी-वाशी धावली होती.



हेही वाचा -

शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

IPL मध्ये होऊ घातलेत पाॅवरफूल बदल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा