Advertisement

शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

राज्यात महायुतीचा सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेला वाद आता आणखीनचं चिघळत चालला आहे.

शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा
SHARES

राज्यात महायुतीचा सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेला वाद आता आणखीनचं चिघळत चालला आहे. शिवसेनेचे केंद्रातील मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, 'शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का राहायचे?, असे ट्विट करत त्यांनी आपण केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत', असं स्पष्ट केले आहे.

कॉंग्रेसची अट

शिवसेनेला राज्यात सत्ता स्थापनेसाठी 'काँग्रेस पक्षाचा पाठिंबा हवा असेल, तर शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावं' ही काँग्रेसची अट असून शिवसेनेनंही अट मान्य केल्याचं म्हटलं जात आहे. त्याशिवाय अरविंद सावंत यांनी देखील पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तसचं, आपला निर्णय जाहीर करताना सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर ताशेरे ओढले आहेत.

हेही वाचा - काँग्रेस आमदारांची शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी? आता लक्ष हायकमांडकडे

राजीनाम्याची घोषणा

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचे सूत्र ठरले होते. दोन्ही पक्षांना हे सूत्र मान्य होते. आता हे सूत्रच नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक आहे, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत भाजपने महाराष्ट्रात फारकत घेतलीच आहे, अशा शब्दांत भाजपवर टीकास्त्र सोडत अरविंद सावंत यांनी युती तोडल्याचा दोष भारतीय जनता पक्षाला दिला आहे.हेही वाचा -

काँग्रेस आमदारांची शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी? आता लक्ष हायकमांडकडे

भाजपला सरकार स्थापनेचं निमंत्रण, पण बहुमताचा आकडा कसा गाठणार?Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा