Advertisement

काँग्रेस आमदारांची शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी? आता लक्ष हायकमांडकडे

काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली असून याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडच घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस आमदारांची शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी? आता लक्ष हायकमांडकडे
SHARES

काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवली असून याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडच घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना राजस्थानमधील जयपूर इथं ठेवलं आहे. राज्यातील सर्व प्रमुख नेते रविवारी जयपूरमध्ये दाखल झाल्यानंतर आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अंदाजे ४० आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्याचं समजत आहे. तसं न केल्यास सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून विरोधी पक्षातील आमदारांची फोडाफोडी देखील होऊ शकते, अशी भीती देखील या आमदारांनी व्यक्त केली. त्यामुळे हायकमांडने यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती देखील त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे केली.

या बैठकीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिक्कार्जुन खर्गे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, जनतेने काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे आम्ही विरोधातच बसणार असून यावरील अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडच घेतील.

तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि आमचे विचार वेगळे असले, आमच्यात राजकीय मतभेद असले, तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. राज्याच्या भल्यासाठी प्रत्येकांनी प्रत्यत्न केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे चांगले नेते होते आणि आहेत, असं म्हणत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना (५६)-राष्ट्रवादी (५४)-काँग्रेस(४४) एकत्रित आल्यास संख्याबळ १५४ वर जाऊन राज्यात नवं सरकार अस्तित्वात येऊ शकतं.



हेही वाचा-

भाजपला सरकार स्थापनेचं निमंत्रण, पण बहुमताचा आकडा कसा गाठणार?

शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी मला शहा, फडणवीस यांची गरज नाही- उद्धव ठाकरे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा