Advertisement

शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी मला शहा, फडणवीस यांची गरज नाही- उद्धव ठाकरे


शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी मला शहा, फडणवीस यांची गरज नाही- उद्धव ठाकरे
SHARES

मी खोटारडा म्हणून शिवसैनिकांसमोर जाऊ शकत नाही. जमत नाही असं म्हटलं तर एकवेळ चाललं असतं. पण ठरलंच नाही असं म्हणणं मी सहन करणार नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्यासाठी मला भाजपचे प्रदेशाध्यक्ष अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही. काहीही झालं तरी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचं दिलेलं वचन मी पूर्ण करणारच, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांना प्रतिउत्तर दिलं.  

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन इथं पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत झालेल्या चर्चेचा खुलासा केला. तसंच शिवसेनेला जाणीवपूर्वक संपवण्याचा भाजपचा डाव होता, असा आरोपही केला. 

हेही वाचा- ज्याच्या जास्त जागा, त्याचाच मुख्यमंत्री -नितीन गडकरी

लोकसभा निवडणुकीच्या आधी मला अमित शहा यांनी फोन करून काय पाहिजे? अशी विचारणा केली होती. त्यावर मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन सांगितलं. त्यावर ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असं शहा म्हणाले. परंतु अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं, असं मी म्हणालो. त्यानंतर शिवसेना प्रमुखांच्या खोलीत बसून झालेल्या चर्चेत शहांनी ही माहिती फडणवीसांना दिली. पण आताच ही माहिती जाहीर करू नका कारण पक्षात माझी अडचण होईल. वेळ येईल, तेव्हा मी पक्षाला सांगेन, असं फडणवीस यांनी नमूद केल्याचं ठाकरे म्हणाले.

अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन पहिल्यांदाच माझ्यावर, ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप केला याचं दुःख वाटलं. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली हे खरं आहे. पण खोटं बोलण्याचा हिशोब काढला तर अच्छे दिन, नोटबंदीपासून कोण खोटं बोललं हे दिसेल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कधीच टीका केलेली नाही. त्यांनी मला धाकटा भाऊ मानलं आहे, भावा-भावाचं नातं पाहून कोणाच्या पोटात दुखत असेल, तर त्याचा मोदींनी शोध घ्यावा,” असंही ते म्हणाले.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मी पाहिली ती पाहून मला आनंद वाटला आणि दुःखही झालं. विकासकामांचा पाढा वाचताना त्यांनी शिवसेना सोबत होती की नाही? असा उल्लेख केला. आम्ही सोबत नसतो तर ही विकासकामं तुम्ही करु शकला असता का? असा प्रश्न विचारत कोणत्याही टीकेची पर्वा न करता गेली ५ वर्ष सत्तेत असूनही जनतेची बाजू मांडत राहिलो, असं ठाकरे म्हणाले.हेही वाचा-

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, फडणवीसही आपल्या वक्तव्यावर ठाम

वाचाळवीरांमुळे युतीत दरी, मुख्यमंत्र्यांची अप्रत्यक्ष राऊतांवर टीकाRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement