ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री -नितीन गडकरी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन भाजप-सेनेनं सरकार बनवावं, अजूनही वेळ गेलेली नाही, असंही गडकरी म्हणाले.

SHARE

 अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे भाजपा आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, असं मत केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. 

मुंबईत माध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून युतीत ज्या पक्षाच्या अधिक जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं ठरलं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून आले आहेत. शिवसेनेपेक्षा आमचे जास्त आमदार निवडून आले असल्यामुळे आमचाच मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट आहे.

शिवसेना आणि भाजपात ५०-५० फाॅर्म्युला असा काही ठरलेला नाही. विधानसभा निवडणुकीनंतर बोलू असे ठरले होते. मात्र ते सध्या चर्चेस तयार नाहीत. हिंदुत्वावर आधारीत भाजपा आणि शिवसेनेची युती आहे. शिवसेनेने आघाडीसोबत जाणे हे अनैसर्गिक असून युती ठेवायची की नाही हा त्यांचा अधिकार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन भाजप-सेनेनं सरकार बनवावं, अजूनही वेळ गेलेली नाही, असंही गडकरी म्हणाले. हेही वाचा  -

अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, फडणवीसही आपल्या वक्तव्यावर ठाम

पुढचं सरकार भाजपचंच, फडणवीस यांना विश्वास
संबंधित विषय
ताज्या बातम्या