Advertisement

फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेला मिळालं 'इतकं' उत्पन्न

फुकट्या प्रवाशांवरील कारवाईतून मध्य रेल्वेला चांगलाच फायदा झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम राबवली.

फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेला मिळालं 'इतकं' उत्पन्न
SHARES

फुकट्या प्रवाशांवरील कारवाईतून मध्य रेल्वेला चांगलाच फायदा झाला आहे.  आॅक्टोबर महिन्यात मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम राबवली. या कारवाईतून रेल्वेला २२.८७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या आॅक्टोबरमध्ये केलेल्या कारवाईत रेल्वेने १३.४२ कोटींचा दंड वसूल केला होता. 

आॅक्टोबर २०१९ मध्ये, विना तिकीट आणि अनियमित प्रवासाच्या ४.२५ लाख प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील वर्षी अॉक्टोबर मध्ये २.८० लाख प्रकरणांची नोंद झाली होती. एप्रिल ते अॉक्टोबर २०१९ या कालावधीत विना तिकीट आणि अन-बुक केलेल्या सामानांच्या एकूण २४.०४ लाख प्रकरणांची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत २०.८१ लाख प्रकरणांची नोंद झाली होती. 

एप्रिल ते अॉक्टोबर २०१९ या कालावधीत विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून १२६.६७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.  मागील वर्षी याच कालावधीतील या दंडाची रक्कम १०३.७७ कोटी रूपये होती.  अॉक्टोबर २०१९ मध्ये आरक्षित प्रवाशी तिकीटांच्या हस्तांतरणाची ६९५ प्रकरणे नोंदविण्यात आली आणि ५.६० लाख रुपये दंड स्वरूपात वसूल केला गेला. 

दिवाळी आणि छठ पूजेच्या सणांच्या दरम्यान आयोजित विशेष तिकीट तपासणी मोहिमेमुळे अनियमित प्रवासाला प्रतिबंध करण्यासाठी मदत झाली आहे. २१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत १३.९४ कोटी रुपये उत्पन्न तिकीट तपासणीतून मिळाले आहे. हे उत्पन्न मागील वर्षीच्या १ ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीतील ११.६८ कोटी रुपयांच्या तुलनेत १९.३७% अधिक आहे.



हेही वाचा -

सवलतीसाठी रेल्वे प्रवाशी वाढवतात वय




 
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा